Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धक्कादायक, रस्त्यावर थुंकणा-याच्या दंड वसूलीत बोगसगिरी

कार्बनकाॅपी देवून दंडात्मक रक्कम वसुलीचा प्रकार निगडी परिसरात उघड

महापालिका मुख्य आरोग्य अधिका-यांचे दुर्लक्ष, आरोग्य कर्मचा-यांचे कृत्य

विकास शिंदे

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर मावा, गुटखा, पान खाऊन थुंकणा-या नागरिकांवर आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या खिशाला कात्री लावताना बोगसगिरी करु लागले आहेत. दंड म्हणून फाडलेल्या पावतीची कार्बनकाॅपी देवून पुन्हा नागरिकांना दंड आकारण्यात येवू लागल्याचा धक्कादायक निगडी परिसरात प्रकार उघडकीस आला आहे.

शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येते. तसेच सार्वजनिक स्वच्छता राखण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे.

त्यानूसार पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य विभागाकडून नागरिकांकडून दंड आकारण्याची मोहीम राबविली आहे. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या, मास्क न वापरणा-या नागरिकांकडून 500 किंवा 1000 रुपये दंड आकारण्यात येत होता. मात्र, ही दंडाची रक्कम जास्त असल्याने स्थायी समिती सभेने 3 जून रोजी दंडाची रक्कम 500 ऐवजी 200 रुपये आकारावा, असा ठराव मंजूर केला.  

कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांना दंडात्मक कारवाईमुळे मास्कचा सर्वाधिक वापर करु लागले आहेत. परंतू, आरोग्य विभागाचे कर्मचारी दंडाची पावती फाडताना बोगसगिरी करु लागल्याचे उघड झाले आहे. अक्षय मनोज परदेशी (रा. विश्रांतवाडी) यांना दंड म्हणून फाडलेल्या पावतीच्या कार्बनकाॅपीवर आतिष कसबे ( रा. निगडी) यांना रस्त्यावर थुंकल्याने ही कारवाई केलीय. ही कारवाई करताना कार्बनकाॅपीची पावती देवून नागरिकांना दंड आकारण्यात येत आहे.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचा-यांनी कोरोना महामारीची संधी ओळखून शहरात जागोजागी नागरिकांना अडवून दंड वसुली सुरु आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी बोगसगिरी करु लागल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित मुख्य आरोग्य अधिका-यांचे दुर्लक्ष झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button