Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहूरोड येथे आइस्क्रीममधून ६ जणांना विषबाधा

पिंपरी –  देहूरोड थॉमस कॉलनी येथे आइस्क्रीममधून दोन महिलांसह चार मुलांना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारार्थ देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
रुकय्या इम्तियाज अन्सारी (वय २७), गुलजार रियाज अन्सारी (वय २५), रिहान इम्तियाज अन्सारी (वय अडीच वर्षे), अक्सा इम्तियाज अन्सारी (वय ५), मिसबा इम्तियाज अन्सारी (वय 7), अमन मेहमुद अन्सारी ( वय १२, सर्व रा थॉमस कॉलनी, मामुर्डी, देहूरोड, पुणे) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. निशाद महमद अन्सारी (रा. थॉमस कॉलनी, मामुर्डी, देहूरोड , पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार थॉमस कॉलनीमध्ये किरण एंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. सोमवारी ( दि. १४) दुपारी दोनच्या सुमारास या दुकानातुन कुल्फी आईस्क्रीम आणली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button