Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दहा महिन्यांनी उघडले अंबाबाई मंदिराचे महाद्वार; भाविकांना मिळणार ‘मुखदर्शन’

कोल्हापूर |महाईन्यूज|

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा महाद्वार दरवाजा आज तमाम भाविकांसाठी उघडलाय. कोरोणाच्या संकटानंतर तब्बल दहा महिन्यानंतर महाद्वार मुख दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते उघडण्यात आले आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून महाद्वार बंद असल्याने भाविकांना बाहेरून मुखदर्शन घ्यावे लागत होतं. मात्र आता मंदिराच्या आत येऊन मुखदर्शन घेता येणार आहे. कोरोणाच्या संकटामुळे अंबाबाई मंदिराचा महाद्वार दरवाजा बंद होता. तो आज विधिवत पूजा करत हार अर्पण करून उघडण्यात आला आहे.

देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते आणि देवस्थान समितीचे कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पवार यांच्यासह सदस्यांच्या उपस्थितीत हा दरवाजा उघडण्यात आला आहे. दरवाजा उघडताच भाविकांनी मुख्य दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती शासनाचे सर्व नियम पाळून भाविकांना दर्शन घेता येणार आहे

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button