ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विवान पाटीलला ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’

शिक्षण विश्व : राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेत द्वितीय श्रेणीचा मान

पिंपरी- चिंचवड | पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमधील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी विवान पाटील याने चित्रकलेत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’ पटकावला आहे. त्याला राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय श्रेणीतील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुण्यातील ‘कलादर्पण’ संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध गटांमध्ये राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या चौथ्या राष्ट्रीय कलादर्पण चित्रकला स्पर्धेत देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांपैकी एकूण २२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये ११ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तर ११ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीचे पारितोषिक देण्यात आले.

हेही वाचा

नवोन्मेष व तांत्रिक कौशल्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची : डॉ. राजेंद्र हिरेमठ

प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांना ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’, स्मृतिचिन्ह आणि मोबाईल भेट देण्यात आला, तर द्वितीय श्रेणीतील विद्यार्थ्यांना ‘ग्रेट आर्टिस्ट राजा रवि वर्मा पुरस्कार’, स्मृतिचिन्ह आणि सायकल प्रदान करण्यात आली. हा मान मिळवणारा विवान पाटील हा एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. विवानला चित्रकला शिक्षक कुलदीप घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

गुणवंत विद्यार्थ्याचे केले अभिनंदन…

या यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, शाळेच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा आणि मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांनी विवानचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button