ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

नवोन्मेष व तांत्रिक कौशल्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची : डॉ. राजेंद्र हिरेमठ

शिक्षण विश्व: टेक्नोव्हेट २०२६ तांत्रिक स्पर्धा उत्साहात

पिंपरी- चिंचवड | युवकांमध्ये नवोन्मेष, तांत्रिक कौशल्य, स्टार्टअप, वित्तीय नियोजन आणि उद्योजकता विकसित करण्यासाठी टेक्नोव्हेटसारख्या तांत्रिक स्पर्धांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन करिअर समुपदेशक तथा सिनर्जी व्हॅल्युअर्स अँड प्रोजेक्ट कन्सल्टंट प्रा. लि.चे संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी केले. विद्यार्थ्यांनी ग्रामीण विकास, संशोधन आणि उद्योजकतेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर) येथे वार्षिक तांत्रिक महोत्सवानिमित्त “टेक्नोव्हेट २०२६” या तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशभरातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या संघांना एकूण दोन लाख रुपयांची बक्षिसे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमास पीसीसीओइआरचे संचालक तथा प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सावी इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक डॉ. विकास पाटील, संशोधन विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे आदी उपस्थित होते.

डॉ. विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याच्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक कौशल्य, उद्योग क्षेत्रातील गरजा आणि करिअरच्या नव्या संधींबाबत जागरूक राहण्याची आवश्यकता व्यक्त केली.

हेही वाचा

शिक्षण विश्व: पिंपरीतील डीपीयूमध्ये उद्या 17 वा पदवीप्रदान समारंभ

प्रास्ताविकात डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. संस्थेमध्ये तांत्रिक वातावरण, संशोधन संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

डॉ. सुदर्शन बोबडे यांनी विद्यार्थ्यांनी नवोन्मेष आणि पेटंट्सच्या माध्यमातून जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच प्रकल्प सादरीकरण, स्टार्टअप्स आणि इंडस्ट्री-ओरिएंटेड शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. दिपाली ढाके, प्रा. अक्षय राहणे, विद्यार्थी समन्वयक कुशल बोरसे आणि श्रेया रेवडे यांनी सहभाग घेतला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्वागत डॉ. सुदर्शन बोबडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अक्षय राहणे यांनी मानले.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते :

  • थ्री डी प्रिंटिंग डिझाइन स्पर्धा : अनुप कुलकर्णी व करण मेंदाद (पीसीसीओइआर)
  • स्ट्रक्ट्रोमॅनिया स्पर्धा : हर्ष कुंभार व टीम (पीसीसीओइआर, रावेत)
  • बीजीएमआय स्पर्धा : प्रशांत शर्मा (एस. बी. पाटील कॉलेज, रावेत)
  • आयपीएल ऑक्शन स्पर्धा : साई गोळेकर व टीम (सीएसके)
  • प्रॉम्प्ट बॅटल स्पर्धा : विनय वानखेडे, चेतन यादव, प्रणव तुसे, संकल्प तुसे (टीम ब्रेन हॅकर्स, पीसीसीओइआर)
  • शार्क टँक स्पर्धा : सृष्टी काकड, अथर्व दरपुडे, आर्यन सुर्वे (टीम महावायू इनोवेशन, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button