ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

शिक्षण विश्व: पिंपरीतील डीपीयूमध्ये उद्या 17 वा पदवीप्रदान समारंभ

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया प्रमुख पाहुणे; 18 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

पिंपरी-चिंचवड | डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे 17 वा पदवीप्रदान समारंभ शनिवारी (दि. 9 मे) दुपारी 3.30 वाजता विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास केंद्रीय दळणवळण मंत्री तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील असतील. यावेळी वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. (ब्रिगे.) अमरजित सिंग तसेच डॉ. ए. एल. काकराणी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

हेही वाचा

आठवणींचे गाठोडे : ज्येष्ठ नागरिकांच्या सहलीतील आठवणींचे संकलन!

या पदवीप्रदान समारंभात विविध विद्याशाखांतील गुणवंत 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच एकूण 18 हजार 720 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असून, त्यामध्ये 48 पीएच.डी., 16 हजार 752 पदव्युत्तर पदव्या, 1 हजार 905 पदव्या आणि 15 पदविका यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी विद्यापीठाच्या नऊ विविध विद्याशाखांतील आहेत.

समारंभास प्र-कुलपती डॉ. सौ. भाग्यश्री पी. पाटील, डॉ. सोमनाथ पी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. सौ. स्मिता जाधव तसेच विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पी. पाटील यांच्यासह विविध मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button