Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
चोरट्यांनी महामार्गावरून पळविली पार्क केलेली बस
पिंपरी |महाईन्यूज|
वाहनचोरीच्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी, वाहनचोरीचे प्रकार रोखण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दुचाकी, चारचाकी वाहनांची सर्रास चोरी होत असतानाच वाहनचोरट्यांनी अवजड वाहनांकडे देखील मोर्चा वळविला आहे. पिंपरी येथे महामार्गावर पार्क केलेली बस चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
अजमेर राजमहंमद पटेल (वय ३५, रा. कासारवाडी) यांनी याबाबत रविवारी (दि. ८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी खासगी बसचे चालक आहेत. फिर्यादी यांनी २९ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील शेल पेट्रोल पंपावर बस लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची साडेचार लाख रुपये किमतीची बस चोरून नेली. हा प्रकार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आला.





