Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खान्देश कानबाई माता उत्सवाचे प्रमुख संयोजक म्हणून नामदेव ढाके यांच्या नावाची घोषणा!

उत्सवाच्या यशस्वीतेसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन

पिंपरी | ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५’ करीता प्रमुख संयोजक म्हणून माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली. रविवारी सायंकाळी खान्देश मराठा मंडळाच्या सभागृहात ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५’ ची बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीला खान्देशातील विविध समाज प्रतिनिधी आणि खान्देश मराठा मंडळाचे संचालक उपस्थित होते. उत्सवाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा होऊन काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष ॲड. हेमंत चव्हाण यांनी सभेचे प्रयोजन स्पष्ट केले. तसेच, उपस्थित सर्व सदस्यांना चर्चेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. यावेळी, नामदेवराव ढाके, ॲड. हेमंत चव्हाण, शंकर पाटील, दिनेश निकम, अविनाश अहिरे, युवराज अहिरे, कोमलसिंग राजपूत, शिवाजी पाटील, देविदास पाटील, पंकज निकम, रविंद्र माळी, लिलाधर मगरे, रविंद्र पाटील, सचिन महाले, सुनील मराठे, राजेंद्र देसले, जितेंद्र पाटील, अनिल सावंत, किशोर पाटील, मनोहर पाटील, जितेंद्र पाटील, प्रदीप शिंदे, प्रदीप शिरसाठ, रविंद्र फुलपगारे, विलास महाजन, हेमंत पाटील, भगवान निकम, प्रदीप पटेल, सोयम अस्वार यांसह खान्देशातील सर्व समाजाचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा    :      जीएसटी नोंदणी पध्दत सोपी करा; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अप्रत्यक्ष कर विभागाला सूचना

या बैठकीत नामदेवराव ढाके यांनी उत्सवाचे सर्व खर्च करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या या भूमिकेचे सभेने कौतुक करत एकमताने नामदेवराव ढाके हे ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सवा’चे प्रमुख संयोजक असतील. त्यांच्या या नेतृत्वाखाली उत्सव यशस्वी होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. उत्सवाशी संबंधित सर्व आर्थिक निर्णय आणि जबाबदारी आता नामदेव ढाके यांच्याकडे असेल. खान्देश मराठा मंडळाचे प्रतिनिधी म्हणून अनिल सावंत निरीक्षक म्हणून सहकार्य करतील.

या बैठकीत सामाजिक भान जपून ‘कानबाई उत्सव समिती’ने सर्व समाज प्रतिनिधी, सामाजिक मंडळ सदस्य आणि महिला सदस्यांना समितीमध्ये समाविष्ट करून खान्देशी संस्कृतीचे मानाचे स्थान अबाधित राखण्यासाठी एकदिलाने कार्य करण्याचा संकल्प केला. पुढील काळात एकत्र किंवा कोपरा बैठका घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल असे सर्वानुमते ठरले. उत्सवाशी संबंधित नियोजन, आवश्यक परवाने, कलाकार आणि इतर व्यवस्थापकीय बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. सर्वांनी कानबाई माता उत्सव ठरल्याप्रमाणे यशस्वी करण्यासाठी योग्य ते योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून, आगामी कानबाई माता उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्वजण एकदिलाने काम करण्यास कटिबद्ध आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button