Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर कोविड सेंटरचे उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी | प्रतिनिधी

कोरोना संकटाच्या काळात पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवड कराणा जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असून सीएसआरच्या माध्यमातून बाणेर येथे सहा मजली कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे,

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड येथे मोरवाडी ऑटो क्लस्टर येथे कोविड सेंटरचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते पार पडणार आहे.

उपरोक्त जम्बो सेंटरनंतर सर्व सुविधायुक्त मोठे कोविड सेंटर पिंपरी चिंचवड शहरात उभे राहत, उद्या सकाळी १०.३० वाजता  त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील,महापौर माई ढोरे, आमदार महेश लांडगे ,आमदार लक्ष्मण जगताप,यांच्या उपस्थिती पार पडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button