Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गरीब जनतेची ५० टक्के वीज बिले माफ करा; पिंपरीत आरपीआय (आठवले) गटाकडून आंदोलन

पिंपरी । प्रतिनिधी

राज्य सरकारने कोरोना काळातील गरीब जनतेच्या वीज बीलातील ५० टक्के वीज बिल माफ करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाने व पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडीच्या वतीने कुणाल वाव्हळकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीगाव येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच कार्यकारी अभियंता वायफळकर साहेब यांना निवेदन देवून चर्चा केली.

यावेळी ज्येष्ठनेते महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, महाराष्ट्र अल्पसंख्यक उपाध्यक्ष ख़्वाजा भाई शेख, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुजित कांबळे, बाळासाहेब जोगदंड, किशोर पाटोळे, सचिन अडागळे, अरून सोंदरमल, मुंजोबा भद्रे, अक्षय दुनघव, विजय ठोसर यांच्यासह आठवले गटाचे महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शहर युवक अध्यक्ष कुणाल वाव्हळकर म्हणाले की, कोरोना काळातील पिंपरी चिंचवड शहरातील गरीब जनतेच्या वीज बिलात सवलत देण्यात यावी. यासाठी आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार युवक रस्त्यावर उतरले आहेत. वीज बिल सवलतीवरुन मंत्रिमंडळात समन्वयाचा अभाव आहे. मंत्र्यांकडूनच सवलतीची घोषणा होतायेत. त्यानंतर वीज बिल भरण्याचं आवाहन, वाढीव वीज बिलांवरून जनतेत संभ्रम आहे. महाविकास आघाडी सरकारने सामान्य जनतेला बिलात निम्मी सवलत द्यावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button