पिंपरी / चिंचवड

‘क’ प्रभाग समिती अध्यक्षांनी नाकारले सरकारी वाहन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी महापालिकेचे वाहन वापरणार नसल्याचे शनिवारी (दि.16 ) जाहीर केले.

 

यावेळी नम्रता लोंढे म्हणाल्या की, माझ्याकडे स्वतःची गाडी आहे, त्यामुळे मी माझ्या खासगी गाडीचा वापर करणार आहे. महापालिकेला एका गाडीवर जर दीड-दोन लाख  रुपयांचा खर्च होत असेल, तर त्याची बचत व्हावी, व तो महापालिकेच्या इतर कामांसाठी वापराला जावा, म्हणून मी महापालिकेचे वाहन नाकारले आहे. तसेच, पक्षातर्फे एक सकारात्मक संदेश जनतेत जाणे गरजेचे आहे. कारण जनतेने जो विश्वास ठेवला आहे. तो आम्हाला सार्थ करायचा आहे. दरम्यान, या  सकारात्मक निर्णयाचे इतरही पदाधिकारी अनुरकरण करतील, याची मला खात्री आहे, असे नम्रता लोंढे यांनी स्पष्ट केले.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button