Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काळेवाडी फाट्याशेजारील भूखंड, अर्धवट सीमाभिंतीचे काम प्राधिकरणाकडून सुरु

– नगरसेवक संदीप कस्पटे यांचा पाठपुरावा
पिंपरी, ( महा ई न्यूज ) – काळेवाडी फाटा ते कस्पटेवस्ती रोडवरील प्राधिकरणाचे मोकळे भूखंड दारु पिणा-याचे अड्डे बनले होते. त्या भुखंडाना सीमाभिंत नसल्याने अनेक अवैध धंदेही सुरु होते. त्या आरक्षित भुखंडाला सीमाभिंत बांधण्यात आली होती. परंतू, कित्येक वर्षापासून सीमाभिंतीचे काम अर्धवट अवस्थेत होते. त्या अर्धवट कामाचा नगरसेवक संदीप कस्पटे यांनी प्राधिकरणांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर प्राधिकरणाकडून अर्धवट सीमाभिंतीचे काम पुर्ण करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.
कस्पटेवस्ती ते काळेवाडी फाट्याजवळ नवनगर विकास प्राधिकरणाचे  रस्त्याच्या दुतर्फा आरक्षित भुखंड होते. त्या भूखंडावर काही ठिकाणी सिमाभिंतीचे अर्धवट राहिलेले होते. ते काम  काम पुर्ण करावे, रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे, पार्किंग, वाळूच्या गाड्या, ट्रॅवल्सच्या गाड्या हटविण्यात यावे, याकरिता नगरसेवक संदिप कस्पटे यांनी सतत पाठपुरावा केला.
याबाबत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील संबंधित प्राधिकरणाच्या विभागाला सुचना दिल्या. मागील आठवड्यात नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी अधिका-यासह पाहणी केली. त्यानंतर आज शुक्रवारी त्या अर्धवट सिमाभिंत पुर्ण करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. तसेच तेथील अतिक्रमणे ही हटविण्यात आली.
सदरील भुखंडामुळे कस्पटेवस्तीत प्रवेश करताना बकालपणा आला होता. परिसरातील लहान मुले-मुली, महिला भगिनी व नागरिकांना ये-जा करताना कचरा, अनधिकृत वाहने, टपरी, हातगाडे, रात्रीच्या वेळी दारु पिऊन त्रास देणा-याचा त्रास वाढला होता. तो त्रास आता कायमस्वरुपी संपला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दरम्यान, या मोकळ्या भुखंडाच्या जागेवर महापालिकेच्या माध्यमातुन खेळाचे मैदान, विरंगुळा केंद्र व्हावे, ही मागणी नगरसेवक संदिप कस्पटे यांनी केली आहे. संबंधित विभागाशी याचा पाठपुरावा सुरु आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button