Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
उत्तरप्रदेश मधील सामुहिक अत्याचार व हत्याकांडाच्या निषेधार्त पिंपरीत वाल्मिकी समाजाचा आक्रोश

पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी
उत्तरप्रदेश मधील सामुहिक अत्याचार व हत्याकांडाच्या निषेधार्त पिंपरीतील वाल्मिकी समाजाने आज सायंकाळी सात वाजता कॅॅ॑डल मार्च काढला. मिलिंदनगर ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी हा मार्च काढण्यात आला.
यामध्ये विविध सामाजिक संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. वाल्मिकी समाजाचा मोठा समुदाय भाजप सरकारच्या विरोधात आक्रोष व्यक्त करत होता. यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. या मार्चमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता.









