इंद्रायणीनगरच्या पोलीस लाईनमध्ये स्वच्छता अभियान, सभापती विलास मडिगेरींचा पुढाकार

पिंपरी, (महाईन्यूज) – भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या वतीने इंद्रायणीनगरमध्ये सेक्टर 2 मधील पोलीस लाईनमध्ये आज सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तब्बल दोन ट्रक कचरा जमा करून परिसराची स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविले जाते. मात्र, हे अभियान वारंवार घेऊन आपण राहत असलेल्या परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. ही भावना बाळगून स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्यासमवेत इंद्रायणीनगर सेक्टर 2 मधील पोलीस लाईनची सकाळी सात ते अकरा या वेळेत स्वच्छता केली. दोन कचरा गाड्या भरून कचरा संकलीत करण्यात आला.
या अभियानात मडिगेरी यांच्यासह पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, महापालिकेचे सह आयुक्त सी. एस. दांगट, आरोग्य निरीक्षक भोसले आदींसोबत 40 कर्मचारी सहभागी झाले होते.





