Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डीतील स्टार रुग्णालयावर गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूनंतरही हेळसांड

पिंपरी |महाईन्यूज|

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची जादा दराने विक्री झाल्याची घटना आकुर्डी येथील स्टार रुग्णालयात घडली होती. आता कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्या नातेवाइकांकडून अतिदक्षता विभागाचे वाढीव भाडे घेतल्याप्रकरणी फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. अमित वाघ व रोखपाल (नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी मुस्तफा अब्दुलगफार तांबोळी (रा. पाटीलनगर, चिखली) यांच्या आई मुमताज तांबोळी (वय 37) यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने या रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने अतिदक्षता विभागात दाखल केले. उपचारादरम्यान 24 ऑगस्टला रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी मुमताज यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

तरीही रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या बिलात 25 ऑगस्टपर्यंतचे बिल बनविले. यामध्ये स्वतः:च्या आर्थिक फायद्यासाठी लुबाडणूक करण्याच्या उद्देशाने रुग्णालयात बिल बनवून पैसे स्वीकारणाऱ्या एका व्यक्तीने फिर्यादीकडून व्हेंटिलेटरचे नऊ हजार रुपयांचे वाढीव बिल स्वीकारले. याप्रकरणी रुग्णालयाचे संचालक वाघ व बिल बनवून पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीवर निगडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button