ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाद्वारे भाजपाकडून ‘श्रमदान’

शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पुढाकार : पिंपळे गुरव, सांगवीसह शहरात स्वच्छता मोहीम

पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सुरू केलेल्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम भारतभर राबविण्यात येत आहे. ज्या प्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो. त्याप्रमाणे आपण आपला परिसरदेखील स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे. या उद्देश्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात ‘श्रमदान’ केलेल्या प्रत्येक नागरिकाचे आभार व्यक्त करतो, असे मत भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे गुरव, जुनी सांगवी, सांगवीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात आले होते. ‘एक तास स्वच्छतेच्या श्रमदानासाठी’ या कार्यक्रमात अनेक नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सहभागी होताना या परिसराची स्वच्छता केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मनापासून योगदान दिले, त्या सर्वांचे मनापासून आभार मानले. तसेच यापुढील काळात आपण आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले.

यावेळी आमदार अश्विनी जगताप, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, सागर अंघोळकर, माजी नगरसेविका उषा मुंढे, शारदा सोनावणे, वैशाली जवळकर, माजी स्वीकृत सदस्य महेश जगताप, शशिकांत दुधारे, राहुल जवळकर, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, संघाचे पदाधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, पिंपळे गुरव प्राथमिक, माध्यमिक प्रशालेचे विद्यार्थी या सर्वांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, महानगरपालिका प्रशासनानेही ‘सारथी हेल्पलाईन’च्या माध्यमातून स्वच्छतेच्या तक्रारींसाठी ‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून दिला आहे. यामुळे अनेक नागरीक थेट आपल्या सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्या पालिकेपर्यंत पोचवत आहेत. महापालिकेचे कर्मचारी देखील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामुळे आपला परिसर सर्वार्थाने स्वच्छ आणि नेटनेटका राखण्यासाठी मोठी मदत होत आहे.

“स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी, म्हणजे रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी नागरिकांनी आपआपल्या भागात “एक तारीख एक तास” या उपक्रमांतर्गत जिथे कुठे शक्य आहे, तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभागी व्हावे. स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button