पिंपरी / चिंचवड

मध्य प्रदेशातील अट्टल गुन्हेगारांनी घातली पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंगावर कार

– गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये झटापट

– एक पोलीस गंभीर जखमी, सहाजण पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी l प्रतिनिधी

मध्य प्रदेश मधील अट्टल गुन्हेगारांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंगावर कार घातली. त्यानंतर पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात झटापट झाली. दरम्यान एक पोलीस गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी सहा गुन्हेगारांना अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी घडली आहे.

मध्य प्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन कारमधून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच उर्से टोलनाक्यावर सापळा लावला. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास दोन कार उर्से टोल नाक्यावरून पुढे जात असताना पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने कार न थांबवता थेट पोलिसांच्या अंगावर कार घातली. यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांना अडवून सहा जणांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात झटापट झाली. काहीजण उर्से टोल नाक्याजवळ असलेल्या डोंगरात पळून गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सर्व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उर्से टोल नाक्याकडे धाव घेतली.

दरम्यान पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे हे देखील स्वतः घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button