breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेशी अश्लील वर्तण

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या महिला पेशंटसोबत डॉक्टरने अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 23) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

हर्षल बसवराज निबान्नवर (वय 28, रा. पिंपरी, मूळ रा. धारवाड, कर्नाटक) असे डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास पीडित तरुणी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे उपचारासाठी आली होती. लेबर रूम वॉर्ड नंबर 58 मध्ये असलेल्या हर्षल याने तपासण्याच्या बहाण्याने तरुणीशी अश्लील चाळे केले. ‘तुम्हाला बरे वाटू अगर न वाटू तुम्हाला चार दिवस अडमिट राहावे लागेल. मी तुम्हाला चहा नाष्टा आणून देऊ का?’ असे म्हणून त्याने तरुणीसोबत अश्लिल वर्तन केले. याबाबत विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button