breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासगी रुग्णालयाबाबत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्ताचा ‘तो’ आदेश मागे

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असेल, तरच रुग्ण दाखल करून घ्यावे, असा अजब आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिला होता. मात्र, हा आदेश रुग्णांच्या जीवावर उठू शकतो, अशी टिका सर्व स्तरांतून होवू लागल्यानंतर आयुक्तांनी तो आदेश मागे घेवून सुधारित आदेश काढला आहे. त्यात खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनबाबत नियमवली दिली आहे.

संपुर्ण राज्यभरात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, त्यात सरकारी रुग्णालये फुल्ल झालेली आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याला पसंती देत आहेत. त्यातच खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन कसा पुरवठा करता येईल, यावर तोडगा काढण्याऐवजी आयुक्तांनी ऑक्सिजन नसेल तर रुग्ण दाखल करून घेऊ नका, असा अजब आदेश काढला. याबाबत वृत्त प्रसिध्द होताच आयुक्त राजेश पाटील यांनी आपला तो आदेश मागे घेतला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आता सुधारित आदेश काढून खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजनची बचत करण्यासाठी नियमावली दिली आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांनी उपचार करताना ऑक्सिजनची बचत करण्यासाठी सुधारित नियमावली आखण्यात आलेली आहे. ही सुधारित नियमावली खाजगी रुग्णालयांना देखील मान्य असल्याचे पिंपरी चिंचवड खाजगी रुग्णालय संघटनेचे अध्यक्ष गणेश भोईर यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button