breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pimpri : जालना लाठीमारच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड ‘बंद’

पिंपरी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज ११ वा दिवस आहे. मागील आठवड्यात या आंदोलनाला गालबोट लागले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यामध्ये अनेक आंदोलन गंभीररित्या जखमी झाले. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये बंद पाळला जात आहे. आज (९ सप्टेंबर) पिंपरी चिंचवड शहरात बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

या प्रमुख संघटनांचा पाठिंबा :

अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड,मराठा महासंघ, मराठा छावा युवा संघटना, काँग्रेस पक्ष, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वराज्य संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, मराठा महासंघ, श्री जगद्गुरू प्रतिष्ठान, अखिल भारतीय छावा, अखिल भारतीय मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विध्यार्थी परिषद, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य अभियान,राजमाता जिजाऊ ज्येष्ठ नागरी संघ, अपणा वतन संघटना, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, छावा युवा मराठा महासंघ, आम आदमी पार्टी, एम आय एम, भिमशाही युवा संघटना, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी, भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती,फुले शाहू आंबेडकर विचार मंच, मराठा जोडो अभियान, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय इसाई महासंघ, दलित पँथर सेना, बौद्ध जनसंघ, शिवशाही संघटना, शिवप्रेमी जनजागरण समिती, मराठा महासभा यासह अनेक सामाज संघटना,कामगार संघटना, व्यापारी संघटना व मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने पाठींबा दर्शवला.

हेही वाचा – Asia Cup 2023 :…तर पाकिस्तान डायरेक्ट फायनलमध्ये; भारतीय संघाचं काय होणार?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डीलक्स चौक मार्गे मेन बाजार पिंपरी या मार्गाने महामोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button