breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाक फायटर विमानांबरोबरच्या डॉगफाईटमध्ये ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची महत्वाची भूमिका

बालाकोट एअर स्ट्राइकच्या दुसऱ्यादिवशी लष्करी तळांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसली होती. यावेळी जमिनीवर असणाऱ्या एअर फोर्सच्या स्टेशनमधून एका महिला अधिकाऱ्याने महत्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. फाईटर कंट्रोलर असलेली ही महिला अधिकारी डॉगफाईटच्यावेळी भारतीय वैमानिकांना पाकिस्तानी फायटर विमानांच्या हालचालीची अचूक माहिती देत होती.

एअर फोर्सच्या या महिला अधिकाऱ्याने दाखवलेली सतर्कता आणि समयसूचकता खरोखर कौतुकास्पद होती. विशिष्ट सेवा पदकासाठी आयएएफकडून या महिला अधिकाऱ्याच्या नावाची शिफारस केली जाऊ शकते. पंजाबमधील एअरफोर्सच्या रडार कंट्रोल स्टेशनमध्ये तैनात असणाऱ्या या महिला स्क्वाड्रन लीडरने तणावाच्या या प्रसंगात संयमाने परिस्थिती हाताळली.

पाकिस्तानच्या २४ फायटर विमानांचा सामना करण्यासाठी हवेत झेपावलेल्या भारतीय फायटर विमानांना ही महिला अधिकारी पाकिस्तानी फायटर विमानांच्या हालचालींची माहिती देत होती. पाकिस्तानच्या या २४ विमानांमध्ये एफ-१६, जेफ-१७ आणि मिराज-५ विमानांचा समावेश होता. भारतीय हवाई दलाने पाकिस्तान बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी विमाने भारतीय हद्दीत शिरली होती.

इंडियन एअर फोर्सने लष्करी तळांना लक्ष्य करण्याची पाकिस्तानची योजना यशस्वी होऊ दिली नाही. पाकिस्तानी विमानांना इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी पिटाळून लावले. २७ फेब्रुवारीला सकाळी ९.४५ च्या सुमारास पाकिस्तानी फायटर विमाने नियंत्रण रेषेच्या दिशेने येत असल्याचे स्पष्ट झाले. राजौरी जिल्ह्यात कालाल भागात पाकिस्तानची तीन ते चार फायटर विमाने नियंत्रण रेषा पार करुन भारतात आली.

भारतीय रडार कंट्रोलकडून लगेच पीर पंजालच्या उत्तर आणि दक्षिणेला गस्तीवर असणाऱ्या दोन सुखोई-३० एमकेआय आणि दोन मिराज-२००० फायटर विमानांना सर्तक करण्यात आले. पाकिस्तानी विमानांचा मोठा ताफा लक्षात घेऊन लगेच श्रीनगर जवळच्या तळावरुन सहा मिग-२१ विमाने हवेत झेपावली. अत्यंत वेगाने या सर्व घडामोडी घडत असताना महिला अधिकाऱ्याने महत्वाची भूमिका बजावली. डॉगफाईटमध्ये अचानक मिग-२१ विमाने आल्याने पाकिस्तानी हवाई दलाला धक्का बसला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button