breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड: फॅमिली फिजिशियन असोसिएशनचा वर्धापन दिन उत्साहात

नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी डॉ.अजित पाटील, सचिवपदी डॉ. महेश शेटे यांची निवड

पिंपरी : फॅमिली फिजिशियन असोसिएशनची ८ वी सर्वसाधारण सभा व वर्धापन दिन उत्सहात झाला. ज्युपिटर हॉस्पिटलच्या सभागृहामध्ये गेल्या २ वर्षांच्या कार्यकाळातील पीएसटी यांचे अहवाल मांडण्यात आले. तसेच, सचिव डॉ. अजित पाटील यांनी संस्थेची प्रगती व संस्थेपुढील आव्हाने यांचा गोषवारा दिला.

हेही वाचा – देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

यावेळी डॉ. सारिका भोईर यांनी मनोगत व्यक्त केले. या सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी डॉ. अजित पाटील, सचिवपदी डॉ. महेश शेटे, खजीनदारपदी डॉ. योगेश पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच, डॉ. स्वप्ना डांगमाळी यांची संयोजक आणि डॉ. सूर्यकांत भिसे, डॉ. शार्दुल पंचवाडकर यांची प्रवक्तेपदी निवड झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button