breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजन

मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड

काळेवाडी येथे दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार संमेलन

पिंपरी: दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड चिंचवड येथे झालेल्या मातंग साहित्य परिषदेच्या बैठकीत निश्चित करण्यात आली.

या बैठकीला हेमंत हरहरे, नरेंद्र पेंडसे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे,मल्हार मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त अनिल सौंदडे व मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे उपस्थित होते. शंकर जगताप यांनी शिक्षण,भारतीय संस्कृती व अध्यात्म या क्षेत्रामध्ये अनेक भरीव कामे केली आहेत. तसेच ते सध्या भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष आहेत.

दुसरे मातंगऋषी साहित्य संमेलन हे येत्या 11 फेब्रुवारी 2024 रोजी पिंपरी-चिंचवड येथील राजवाडा लॉन्स, काळेवाडी येथे होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मातंगऋषीच्या नावाने साहित्य संमेलन जगाच्या पाठीवर फक्त मातंग साहित्य परिषद,पुणे ही साहित्यीक संस्था भरवते, अशी माहिती मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. भिसे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button