breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पेट्रोलचे दर स्थिर, डिझेल मात्र 25 पैशांनी महागले

मुंबई – गेले 21 दिवस पेट्रोलच्या किंमती स्थिर राहिल्यानंतर आता डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. डिझेलच्या किमतीत 25 पैशांनी वाढ झाली असून मुंबईत आज डिझेलची किंमत 96.68 रुपये आहे. तर पेट्रोल 107.26 रुपयांनी विकले जात आहे.

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL)नं दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या राजधानीत आज पेट्रोलची किंमत 101.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे, तर डिझेलची किंमत 25 पैशांनी वाढून 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तेल कंपन्यांनी 1 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबर म्हणजेच, आतापर्यंत दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 15-15 पैसे प्रति लिटरची घट केली होती. सप्टेंबरमध्ये पेट्रोल-डिझेल 30 पैशांनी स्वस्त झालं होतं. परंतु, त्यानंतर इंधनाच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ किंवा घट करण्यात आली नव्हती.

24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किमती देशभरात 20 ते 22 पैशांनी वाढवण्यात आल्या होत्या. तसेच त्यानंतर ठिक 3 दिवसांनी पुन्हा एकदा 25 ते 27 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

मुंबईसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांतील दर

इंडियन ऑयल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोलची किंमत 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 96.68 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तर चेन्नईत पेट्रोलची किंमत 103.79 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 95.10 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button