TOP Newsताज्या घडामोडीपुणे

वातानुकूलित लोकलच्या वाढीव फेऱ्यांसाठी दोन वर्षे प्रतीक्षा? ; २३८ गाडय़ांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे

मुंबई : मेट्रो प्रकारातील अत्याधुनिक अशा २३८ वातानुकूलित लोकल प्रत्यक्षात ताफ्यात दाखल होण्यास दोन वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. तोपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वेवर सेवेत असलेल्या बारा वातानुकूलित लोकल गाडय़ाच धावणार आहेत.

‘एमआरव्हीसी’च्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प-३ अंतर्गत ४७ वातानुकूलित लोकल उपनगरीय प्रवाशांसाठी आणण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला डिसेंबर २०१६ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प ३ ए अंर्तगत १९१ वातानुकूलित लोकल आणण्याचा निर्णय झाला. अशा २३८ वातानुकूलित लोकल भविष्यात येतील.  या  लोकल गाडय़ांची किंमत १९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यासाठी निविदा काढण्यापूर्वी रेल्वे बोर्डाची मंजुरी आवश्यक आहे. तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. याशिवाय वातानुकूलित लोकल नेमकी कशी हवी यासाठीचे तांत्रिक तपशीलही मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविले असून त्याच्याही मंजुरीची प्रतीक्षा  आहे. ही मंजुरी मिळल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी साधारण एक वर्ष लागेल. त्यानंतर वातानुकूलित लोकलचे काम कंपनीकडे सोपविण्यात येईल. त्यानंतर खरेदी व अन्य प्रक्रिया पूर्ण करून  गाडय़ा दाखल होण्यासाठी  एक ते दीड वर्ष लागेल.

सर्वेक्षण लवकरच..

मेट्रो प्रकारातील २३८ वातानुकूलित लोकलसाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय ‘एमआरव्हीसी’ने घेतला आहे. त्यासाठी एका महिन्यात सल्लागाराचीही नियुक्ती केली जाणार आहे. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द न करता या वातानुकूलित लोकल किती फेऱ्यांचा समावेश हा जलद किंवा धिम्या मार्गावर असावा तसेच त्याला कोणत्या वेळेत प्रतिसाद मिळू शकतो आदीचा अभ्यास करण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वातानुकूलित लोकलसाठी निविदा आणि तांत्रिक तपशिलाच्या मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. तो मंजूर होताच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

– सुभाषचंद गुप्ताव्यवस्थापकीय संचालकएमआरव्हीसी

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button