breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी बाजारपेठेत सम-विषम दुकाने उघडण्यास परवानगी, शनिवार-रविवार दुकाने पुर्णपणे राहणार बंद

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवारी व रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, पिंपरी बाजारपेठेत गर्दी होत असल्याने सोमवार, दि. 14 जूनपासून बाजारपेठेत सम-विषम दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पिंपरी बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पी वन, पी-टू असे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू राहणार असून, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. दुकानाच्या विरुद्ध बाजूस वाहनं पार्क करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेमार्फत कारवाई केली जाईल असे पालिकेने म्हटले आहे.

पिंपरी बाजारपेठेची प्रत्यक्ष पाहणी केली असता काही ठिकाणी दुकानदारांनी लपून छपून दुकाने सुरू ठेवल्याचे दिसून आले. कापड मार्केटमध्ये काही ठिकाणी सरसकट दुकानं सुरू ठेवली होती. सम- विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यास व्यापा-यांनी विरोध केला आहे. पालिकेने मात्र, नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील पॉझिटिव्हिटीचा दर 5.2 टक्के आहे. त्यामुळे निर्बंध कायम असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button