breaking-newsआंतरराष्टीय

सीमेवर भारताने पाकिस्तानी सैन्याचे तिसरे ड्रोन विमान पाडले

राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवर श्री गंगानगर सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने शनिवारी पाकिस्तानी सैन्याचे ड्रोन विमान पाडले. २६ फेब्रुवारीच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत ड्रोन पाठण्याचा केलेला हा तिसरा अयशस्वी प्रयत्न आहे.

राजस्थानच्या सीमेवरुन पाकिस्तानी ड्रोनने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. हे पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या नजरेस पडताच त्यांनी ते पाडले.  श्रीगंगानगर जवळ असलेल्या हिंदूमालकोट सीमेवरुन सकाळी पाचच्या सुमारास हे पाकिस्तानी ड्रोन भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते असे बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ANI Digital

@ani_digital

Indian Army troops shot at a Pakistani drone along the international border in Rajasthan’s Sri Ganganagar sector

Read @ANI Story | https://www.aninews.in/news/national/general-news/rajasthan-army-troops-shoot-at-pakistani-drone20190309154505/ 

295 people are talking about this

पश्चिम सीमेजवळ राहणाऱ्या गावकऱ्यांनी सुद्धा गोळीबाराचे मोठे आवाज ऐकले.  चार दिवसांपूर्वीच सोमवारी भारतीय वायुदलाच्या सुखोई-३० विमानाने भारत-पाकिस्तान सीमेवरील राजस्थानच्या बिकानेर सेक्टरमध्ये हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या साहाय्याने पाकिस्तानचे एक लष्करी ड्रोन पाडल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

जमिनीवरील रडार स्थानकाने या ड्रोनची नोंद घेतल्यानंतर काही मिनिटांत, म्हणजे सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास सुखोई-३० विमानाने हे ड्रोन पाडले. गेल्या सहा दिवसांत भारतात हेरगिरीसाठी ड्रोन पाठवण्याचा पाकिस्तानने केलेला हा दुसरा अयशस्वी प्रयत्न होता. २७ फेब्रुवारीला गुजरातच्या कच्छजवळ भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले होते. आतापर्यंत पाकिस्तानची एकूण तीन ड्रोन विमाने पाडण्यात आली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button