breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! तू हिंदू आहेस की मुसलमान?

नवी दिल्ली | महाईन्यूज

सीएएविरोधातील आंदोलनातून दिल्लीत हिंसाचार पेटला आहे. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये परिस्थिी नियंत्रणाबाहेर गेली असून लोकांना तुम्ही हिंदू आहे की मुस्लीम? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. धार्मिक आधारावर मारहाण, हिंसाचार पेटवला जात आहे. असाच धक्कादायक प्रकार दिल्लीतील हिंसाचारादरम्यान घडला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाचा फोटोग्राफर ज्यावेळी मौजपूर मेट्रो स्टेशनला पोहचला, त्यावेळी एक हिंदू सेनेचा सदस्य त्यांच्याजवळ येऊन फोटोग्राफरच्या कपाळावर टिळा लावला. आता तुमचं काम सोप्प होईल, तुम्ही हिंदू आहात मग याने काय नुकसान होणार असं त्या व्यक्तीने फोटोग्राफरला सांगितले. जवळपास १५ मिनिटानंतर परिसरात दोन गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली. यादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. फोटोग्राफर आग लागलेल्या ठिकाणी जायला लागला त्यावेळी त्याला काही लोकांनी शिवमंदिराजवळ थांबवलं. मी फोटो घेण्यास जात आहे असं सांगितल्यानंतरही त्यांनी परवानगी दिली नाही. त्यावेळी तुम्ही हिंदू आहात, कशाला पुढे जाताय? असं विचारण्यात आलं आहे.

काही वेळानंतर फोटोग्राफर बॅरिकेड्सच्या दिशेने गेला, त्यावेळी फोटो घेताना हातात बांबू आणि रॉड घेऊन आलेल्या लोकांनी त्यांना घेरलं. त्यांच्याकडून कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यासोबत असणाऱ्या रिपोर्टर साक्षी चांदने आरडाओरड सुरु केल्यानंतर ते लोक निघून गेले. पण यातील काही लोकांनी फोटोग्राफरचा पाठलाग केला. एका युवकाने त्यांना धमकावले की, तू जास्त उडू नको, तू हिंदू आहे की मुसलमान? इतकचं नाही तर धर्म जाणून घेण्यासाठी त्यांनी पॅँट उतरवण्याची भाषाही वापरली. तेव्हा फोटोग्राफरने हात जोडून विनवणी करु लागल्याने त्यांनी फोटोग्राफरला सोडले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button