पिंपरी / चिंचवड

पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

पिंपरी l प्रतिनिधी

रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल फोन तीन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री पावणे नऊ वाजता फुलेनगर पिंपरी येथे घडली.

वैभव विलास कदम (वय 27, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी. मूळ रा. नांदोरे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम हे कंपनीतून काम झाल्यानंतर रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर पिंपरी येथे घरी पायी चालत जात होते. ते फुलेनगर येथील डी वाय पाटील आर्ट अँड कॉमर्स कॉलेजच्या समोर आले असता एका दुचाकीवरून तीन अनोळखी चोरटे आले. चोरट्यांनी कदम यांच्या हातातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button