breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#pcmcpolitics: विरोधी पक्षनेते, सेना गटनेत्यांचे आरोप मी प्रत्त्यूत्तर देण्याइतके दखलपात्र नाहीत: आमदार लक्ष्मण जगताप

– आता लोकांना मदत हवी आहे; राजकारण नाही : शहराध्यक्ष महेश लांडगे

– रेशनधान्य वाटपवरुन महापालिकेतील सत्ताधारी भाजपा-विरोधक आमनेसामने

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत रेशनकार्ड धारकांना अन्नधान्य वाटपावरुन राजकारण करणारे विरोधी पक्षनेते विठ्ठल  उर्फ नाना काटे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केले आरोप मी प्रत्त्यूत्तर देण्याइतके दखलपात्र नाहीत, अशी भूमिका भाजपाचे आमदार आणि माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली.

          भाजपाचे पदाधिकारी, नगरसदस्य नागरिकांना उपलब्ध होणारे सरकारी राशनचे धान्य स्वतःच्या संस्थांच्या व वैयक्तिक नावाने सांगून नागरिकांना फसवत आहेत. रेशनकार्डच्या आधारे भाजपा नेते-पदाधिकारी आणि नगरसेवक चमकोगिरी करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला होता.

          याबाबत आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, गोरगरिबांना मदत व्हावी म्हणून महापालिका प्रशासन काम करीत आहेत. आम्ही यामध्ये राजकारण केलेले नाही. वैयक्तिक संस्थांच्या नावाने आम्ही रेशनचे धान्यवाटप करीत असेल, तर संबंधितांनी चौकशी करावी आणि कारवाईसुद्धा करावी. तसेच, मी प्रत्त्यूत्तर द्यावे, इतके दखलपात्र विरोधी पक्षनेते आणि शिवसेना गटनेते नाहीत, अशी टीप्पण्णीही जगताप यांनी केली आहे.

          दुसरीकडे, विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे म्हणाले की, आता लोकांना मदतीची गरज आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. कोरोनाचे संकट दूर होवू दे. मग, राजकारण करुन आणि आवश्यकता भासल्यास प्रत्त्यूत्तरही देवू. विरोधकांनी खुशाल चौकशी करावी, आम्ही लोकांसाठी काम करीत आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button