breaking-newsताज्या घडामोडी

‘मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा’ हिंगणघाट पीडितेच्या वडिलांचा संताप…

नागपूर|महाईन्यूज

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने शेवटचा श्वास घेतला. पीडितेने गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली.

तसेच ‘मुलाला आमच्या स्वाधीन केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही. त्याला देखील जिवंत जाळा. त्याला जिवंत जाळल्याशिवाय मुलीच्या आत्माला शांती मिळणार नाही’ अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तसेच ‘मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा’ असं म्हणत पीडित तरुणीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुलीला त्वरीत न्याय मिळाला पाहिजे अशा भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक मंत्री सुनिल केदार  व माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर त्यांनी मृतदेह स्वीकारला व ते हिंगणघाटकडे रवाना झाले असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे.१ डिसेंबर रोजी पेट्रोल टाकून पेटवण्यात आलेल्या प्राध्यापिकेने सोमवारी नागपुरातील खासगी रुग्णालयात आपला अखेरचा श्वास घेतला.

श्रद्धांजली अर्पण करून पीडितेच्या शाळेला दिली सुट्टी
वर्धा, हिंगणघाट येथील जळीत  पीडितेचीआज सकाळी साडे सहा च्या सुमारास निधन झाले. या घटनेची वार्ता शाळेच्या मुख्याध्यापकेस शाळेतील विद्यार्थ्यांना मिळताच पीडितेच्या शाळेत शोकसभा घेऊन पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, त्यानंतर शाळेला सुट्टी देण्यात आली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button