breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : मिळकतकर थकबाकी,नळजोड तोडण्याची जबाबदारी सोसायटीकडे नको: संजीवन सांगळे

चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची भूमिका

पिंपरी: महानगरपालिके कडून पिंपरी चिंचवड शहरातील बऱ्याच सोसायट्यांमधील मालमत्ता कर थकीत सदस्यांचे अंतर्गत नळ कनेक्शन तोडण्याबाबत मा. न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन ही सर्व जबाबदारी सोसायट्यांच्या  मॅनेजमेंट कमिटीवर प्रशासनाने टाकलेली आहे. परंतु  आम्ही कोणत्याही न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत नाही, आमच्या आकलनाप्रमाणे पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि नागरिकांच्या कोणत्याही मूलभूत अधिकारावर गदा आणणे हे नागरिकांना घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे असे आम्हाला वाटते. अशी चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष,संजीवन सांगळे आपली भूमिका जाहीर केली आहे.

सोसायटी समितीना  3 दिवसाचा अवधी दिला असला तरी पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही गृहनिर्माण संस्थेतील कोणतीही मॅनेजमेंट कमिटी त्यांच्या सोसायटीमधील कोणत्याही मालमत्ता कर थकबाकीदारांचे नळ कनेक्शन स्वतः कट करणार नाही.किंवा प्रशासनास अशी नळजोडणी कट करताना विरोधही करणार नाही,असे संजीवन सांगळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे प्रशासनास कळवले आहे.

तरच मनपा प्रशासनास सहकार्य

महानगरपालिकेच्या यंत्रणेकडूनच सोसायटीमध्ये मिळकतकर थकबाकीदार सदस्यांचे नळ कनेक्शन आपण महानगरपालिकेच्या खर्चाने कट करावेत आणि त्यानंतर सदर सभासदांनी त्यांचा पूर्ण मालमत्ता कर भरल्यानंतर त्यांचे नळ कनेक्शन महानगरपालिकेच्या खर्चानेच पूर्ववत करून देण्यात यावे. या सर्व गोष्टी आपल्या महानगरपालिकेकडून पालन केल्या जाणार असतील तर आणि तरच आमच्या फेडरेशन कडून आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीमधील थकबाकीदारकांचे नळ कनेक्शन कट करण्यासाठी सहकार्य केले जाईल याची नोंद घ्यावी.

चुकीच्या मोहिमा व  कृती राबवू नका

एक वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आडमुठेपने, बेकायदेशीर रित्या सोसायटीमधील काही सभासदांच्या मालमत्ता कर थकबाकीमुळे पूर्ण सोसायटीचे नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम राबवली होती, तशा प्रकारची चुकीची बेकायदेशीर कोणतीही कृती किंवा मोहीम आपल्या महानगरपालिकेकडून राबविण्यात येऊ नये .अन्यथा याबाबत तीव्र स्वरूपाचा आक्षेप आणि आंदोलन आमच्या फेडरेशन मार्फत करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली – मोशी – पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button