breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रुग्णांना सेवा नाकारणाऱ्या डॉक्टर, रुग्णालयांवर कारवाई

मुंबई: खासगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील याांनी दिला आहे.

शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोऱ्या जात असून खासगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालय सरकारला मदत करीत आहेत. मात्र, काही डॉक्टर्स व खासगी रुग्णालये त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. खरंतर आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी आणीबाणी भारत देशावर आलेली आहे.

अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करीत आहेत, पण देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातील काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत, या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यावी, असं आवाहन राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button