breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या; हायकोर्टाने याचिका फेटाळली

मुबई – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची याचिका हायकोर्टाने फेटाळल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाटल्या आहेत. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात केली होती.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला हाोता.

आता तेही कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या चौकशीविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. महाराष्ट्र सरकराने सुरू केलेल्या दोन प्रकरणातील तपासाविरोधात याचिका दाखल केली होती.यामध्ये सेवेसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशा दोन प्रकरणांचा समावेश आहे.ही याचिका ‘नॉन मेंटेनेबल’ असल्याचे नमूद करत न्यायालयानं ती फेटाळून लावली आहे.

काय म्हटले होते याचिकेत
राज्यातल्या महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण मी उघड केल्यामुळेच मला लक्ष्य करण्यासाठी हे आरोप ठेवले आहेत.तसेच चौकशी सुरू केली आहे,’ असा दावा परमबीर सिंह यांनी या याचिकेमध्ये केला होता.१ एप्रिल २०२० आणि २० एप्रिल २०२१ रोजी आपल्या चौकशीचे आदेश देण्यात आले.मात्र, आपण पत्राद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतरच आपली चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button