breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

World Cup 2023 : पाकिस्तानचा विश्वचषकासाठी भारतात येण्यास नकार!

IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषत यंदा भारतात होणार आहे. यासाठीचे वेळापत्रकही ICC ने काही दिवसांपुर्वी जाहीर केलं आहे. मात्र आता पाकिस्तान संघ विश्वसचषकासाठी भारतात येणार नसल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात आशियाई क्रिकेट परिषद आणि ICC ला पाकिस्तानने पत्र लिहलं आहे.

पाकिस्तानचे क्रीडामंत्री एहसान मजारी यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्या अखत्यारीत येते. त्यामुळे आशिया चषकासाठी तटस्थ ठिकाणीची मागणी केली आहे, तर आम्ही देखील विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही. त्यांना अहमदाबादमध्ये खेळण्यास काही अडचणी नाही. पण त्यासाठी भारताने देखील आशिया चषकासाठी पाकिस्तानात येऊन खेळायला हवे. तसेच पाकिस्तानात येऊन खेळायला हवे.

हेही वाचा – ‘शिवसेनेचे ‘ते’ १६ आमदार अपात्र ठरणार’; नरहरी झिरवाळ यांचं मोठं विधान

पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांनी विश्वचषकातील पाकिस्तानच्या सहभागासाठी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे प्रमुख परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो हे असणार आहेत. तसेच इतर ११ मंत्री या समितीचा भाग असणार आहेत आणि त्यामध्ये मी देखील आहे, असं एहसान मजारी म्हणाले.

पाकिस्तानकडे यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद आहे. त्यामुळे पाकिस्तानला पाकिस्तानातच सर्व क्रिकेट सामने आयोजित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेलचं समर्थन करत नाही, असंही एहसान मजारी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button