breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन गळती

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी असलेल्या ऑक्सिजन टॅंकचा व्हॉल्व लीक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली. वायसीएम रुग्णालय परिसरात ऑक्सिजनचे धुके तयार झाल्यामुळे भीतिचे वातावरण पसरले होते. सुदैवाने यात दुर्घटना घडली नाही.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात आज ऑक्सिजन गळती झाल्याची घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या 10 टन टँकचा सेफ्टी वॉल लिकेज झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली. सुदैवाने रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या टँकमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम सुरू होते. त्याच दरम्यान प्रेशर जास्त झाल्याने टाकीचा सेफ्टी वॉल लिक झाला आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती सुरू झाली. सुदैवाने अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button