breaking-newsमहाराष्ट्र

राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारा सुरु आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते सुनील केदार यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणे असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नुकतंच त्यांनी मुंबईतील गोरेगावच्या शासकीय महानंद डेअरी येथे भेट दिली होती. यावेळी त्यांनी संचालक मंडळ आणि सदस्य यांच्याशी चर्चा केली. महानंदाच्या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. महानंदच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची संपूर्ण माहिती घेतली होती. दरम्यान, राज्यात सामान्य लोकांसोबतच लोकप्रतिनीधींनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button