पिंपरी / चिंचवड

पूर्ववैमनस्यातून दोघांना रस्त्यात अडवून मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या मित्राला देखील चौघांनी मारहाण केली. तसेच मित्राची सोन्याची चेन जबरदस्तीने ओढून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 17) दुपारी दीड वाजताच्या सुमारास नाशिकफाटा, कासारवाडी येथे घडली.

राज साहेबराव वाघिरे (वय 22, रा. सौंदर्य चौक, पिंपरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश हनुमंत हजारे (रा. अजिंक्य कॉलनी, नरडेनगर, काळेवाडी) आणि त्याचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी नाशिक फाटा कासारवाडी येथून जात होते. ते शीतल हॉटेल जवळ आले असता आरोपी महेश हजारे याने फिर्यादी यांच्या गाडीला गाडी आडवी लावली. फिर्यादी यांना पुढे जाण्यास प्रतिबंध करून जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा मित्र अभिजीत कापसे हा आला. त्याला देखील आरोपींनी मारहाण केली. तसेच अभिजित याची दीड लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने ओढून शिवीगाळ करत आरोपी निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button