पिंपरी / चिंचवड

बँकेतून बोलत असल्याचे सांगत महिलेची दोन लाख 36 हजारांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून अनोळखी महिलेने एका महिलेची क्रेडिट कार्डसंदर्भातील गोपनीय माहिती विचारून दोन लाख 36 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी नेहरूनगर येथे घडली.

शबनम मोहम्मद सय्यद (वय 37, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  9134438588 या क्रमांकावरून बोलणा-या अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 19 फेब्रुवारी रोजी अनोळखी महिलेने 9134438588 या क्रमांकावरून फोन केला. फोनवरील महिलेने आयसीआसीआय बॅंकेतून बोलत असल्याचे फिर्यादीस सांगितले. फिर्यादी यांच्या क्रेडीट कार्डचे शेवटचे चार अंक सांगून फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवून तो नंबर शेअर करण्यास सांगितला. फिर्यादी महिलेने नंबर शेअर करताच त्यांच्या बॅंक खात्यातून 2 लाख 36 हजार 840 रुपये डेबीट झाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button