ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

चिंचवडकरांसाठी लोकोपयोगी योजनांच्या शिबिराचे ‘12 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजन

नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिबिराचे आयोजन

पिंपरी-चिंचवडः भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी व महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे भाजपच्या या दोन्ही जेष्ठ नेत्यांच्या ‘जयंती’निमित्त ‘चिंचवडगाव प्रभाग क्रमांक 18’ मधील सर्व चिंचवडकर नागरिकांसाठी ‘12 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत’ लोकोपयोगी योजनांच्या शिबिराचे चिंचवडगावातील नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष प्रा.सदाशिव खाडे व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे, भाजपा सचिव मधुकर बच्चे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अजित कुलथे, भटके-विमुक्त आघाडीचे शहराध्यक्ष गणेशजी ढाकणे, जेष्ठ कार्यकर्ते पाटीलबुवा चिंचवडे, रविंद्रजी प्रभुणे, तुकाराम चौधरी, नंदूकाका भोगले, प्रदिप सायकर, कैलास सानप, प्रशांतजी आगज्ञान, सुभाषकाका मालुसरे, धनंजयजी शाळिग्राम, मुकुंदराव गुरव, गजाननकाका बावळे, आनंदजी कुलकर्णी, पल्लवीताई पाठक, दिपालीताई कलापुरे, मिथुनजी बोरगांव, अतुल कांबळे यांसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

या शिबिरामधे नागरिकांना या योजनांची लाभ घेता येणार…
1) आयुष्यमान भारत योजना स्मार्ट कार्ड
2) ई- श्रम योजना स्मार्ट कार्ड
3) नविन मतदार नोंदणी
4) मतदान स्मार्ट कार्ड
5) आधार स्मार्ट कार्ड
6) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत कर्ज मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button