breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुदळवाडी परिसरात ‘पोस्ट ऑफिस आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन : दिनेश यादव

पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार पै.महेशदादा लांडगे युवा मंच चिखली यांच्या वतीने कुदळवाडी परिसरात पोस्ट ऑफिस आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती स्विकृत सदस्य तथा भाजयुमोचे शहर सरचिटणीस दिनेश यादव यांनी दिली.

या उपक्रमात अपघात विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, मोफत बाल आधार, पोस्टाचे मोफत बॅंक खाते, आधार मोबाईल लिंकीग ह्या योजना राबविण्यात येणार आहेत. कुदळवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर जवळ शिवसाई पतसंस्थेत दि.२२ व २३ जुलै रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत हा उपक्रम आयोजित केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुदळवाडी परिसरात ‘पोस्ट ऑफिस आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

भारतीय डाक विभागाची लाभदायी योजनांची माहिती खालील प्रमाणे 

पोस्ट ऑफिस सादर करत आहे…

399 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघाती विमा…

🔵 अपघाती मृत्यु – 10 लाख

🔵 कायमचे अपंगत्व – 10 लाख

🔵 दवाखाना खर्च – 60 हज़ार रुपये

🔵 मुलांच्या शिक्षणाचा खर्च -1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल

(जास्तीत जास्त 2 मुलांना संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत)

🔵 अॅडमिट असेपर्यंत दररोज 1000 रुपये (10 दिवस)

🔵 OPD खर्च – 30000

🔵 अपघाताने पॅरालीसीस झाल्यास 10 लाख

🔵 कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च 25000

🔵 वेटिंग पीरीयड नाही

वय : 18 ते 65

सर्वाना 399/ वार्षिक हप्ता

सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फरशीवरून पाय घसरून पडणे, अॅक्सिडेंट असे सर्व अपघात यात समाविष्ट आहेत.

कुदळवाडी, चिखली परिसरातील सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दिनेश यादव यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button