breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरव येथे स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; एकजण अटकेत

पिंपरी – पिंपळे गुरव येथे एका स्पा सेंटर मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे, तर दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 27) सायंकाळी जावळकर कॉलनी, पिंपळे गुरव येथील ‘स्पेशल इफेक्ट स्पा सेंटर’ येथे करण्यात आली.

गोपाल रमेश मिश्रा (वय 33, रा. रामनगर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून या रॅकेटमधील एक महिला (वय 29, रा. हडपसर, पुणे) आणि जुबेर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळकर कॉलनी येथे ‘स्पेशल इफेक्ट स्पा सेंटर’ आहे. यामध्ये आरोपींनी दोन महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी आणले होते. त्या महिलांकडून आरोपी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपी त्यांची गुजराण करत होते.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजता स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटक करून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत आठ हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button