breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

http://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/world-heart-day.jpg

जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

पिंपरी । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे ओम हॉस्पिटल, भोसरी यांनी सामाजिक दायित्व अंतर्गत जागतिक हृदय दिनानिमित्त 17 ऑक्टोबरपर्यंत हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.

ओम हॉस्पिटलचे डॉ. सुनील अग्रवाल हे पुणे शहरातील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आहेत, ज्यांना अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीची फेलोशिप देखील मिळाली आहे. या शिबिराची माहिती देताना ते म्हणाले की, आज धकाधकीची जीवनशैली, तणावपुर्ण जीवन आणि जंक फूड यामुळे हृदयरुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच हृदयविकाराचा खर्चही जास्त असतो, त्यामुळे बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करून उपचार करत नाहीत. हे लक्षात घेऊन ओम हॉस्पिटल, भोसरी यांनी 29 सप्टेंबर रोजी जागतीक हृदय दिनानिमित्त मोफत हृदयरोग तपासणी व माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी 17 ऑक्टोबरपर्यंत शिबिराचे आयोजन केले आहे.

या शिबिरात पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारकांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया यासह हृदय तपासणी मोफत करण्यात येणार आहे. इतर रुग्णालयांच्या तुलनेत अँजिओग्राफीचा खर्च माफक दरात रु. 5000, सिंगल स्टेंट एनजीओ प्लास्टी फक्त 75000 रुपये आणि मेडिक्लेम, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनेंतर्गत मोफत एनजीओप्लास्टी उपचार केले जातील. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ओम हॉस्पिटलच्या कॅथलॅबमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया आणि औषधोपचार केले जातात. पुणे, पिंपरी-चिंचवड, देहू, आळंदी, पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.सुनील अग्रवाल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 91-8888825601/09/04 किंवा omhospitalbhosari.com संपर्क साधा.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील अग्रवाल यांनी अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बायपास सर्जरी यांसारख्या प्रकरणांमध्ये आजपर्यंत 18 हजारांहून अधिक लोकांवर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सुरक्षित उपचार केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button