breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: धारावीत आणखी दोघांना कोरोनाची लागण
धारावीत आणखी दोघांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. करोनाची लागण झालेल्या महिलेच्या वडील आणि भावाला करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. यानंतर पोलिसांकडून डॉक्टर बालिगा नगर परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु आहे. यासोबत धारावीतील करोनाबाधितांची संख्या सातवर पोहोचली आहे. यामध्ये एका मृताचाही समावेश आहे.