breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Asia Cup 2023 Final : आठव्यांदा आशिया कप जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज!

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज सामना होणार

IND vs SL : आशिया चषक २०२३ मधील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. या दोघांमधील स्पर्धेतील ही आठवी विजेतेपदाची लढत असेल. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंका संघ अंतिम फेरीत ७ वेळा आमनेसामने आले आहेत.

भारत आणि श्रीलंका या दोघांमध्ये आत्तापर्यंत झालेल्या ७ फायनलमध्ये श्रीलंकेने ३ तर भारताने ४ विजेतेपदे जिंकून आघाडी कायम ठेवली आहे. आता २०२३ मध्ये होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विजेतेपदाच्या लढतीत दोघांमध्ये बरोबरी होणार की भारत आघाडी कायम ठेवणार?

हेही वाचा – ‘गेल्या वर्षभरात आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले’; एकनाथ शिंदे

दरम्यान, कोलंबो येथे रविवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी पाकिस्तान-श्रीलंका सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे सामना ४२-४२ षटकांचा करण्यात आला. शुक्रवारी मात्र भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान जराही पाऊस झाला नाही. रविवारीही अशीच स्थिती राहील अशी चाहत्यांना आशा असेल. या सामन्यासाठी सोमवार हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button