breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राहुल गांधींसह विरोधी नेत्यांनी इंधन दरवाढीविरोधात काढली सायकल रॅली

नवी दिल्ली |

दिल्लीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सायकल रॅली काढलेली आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील मोदी सरकारवर टीका केली. देशभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहेत. काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५  विरोधी पक्षांची बैठक संपली आहे. आता सर्व खासदार सायकलवरून संसदेत जात आहेत. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून यावेळी सरकारला कोडींत पकडण्यासाठी विरोधकांकडून व्यूहरचना आखली जात आहे. पेगॅसस प्रकरणावरुन संसदेत गदारोळ घालत सरकारला जाब विचारणारे विरोधक एकवटले असून यावेळी पुढील रणनीती आखण्यात आली असं बोललं जात आहे. एकीकडे पेगॅसस प्रकरणामुळे गदारोळ सुरु असताना आसाम-मिझोराम सीमेवर रक्तरंजित संघर्षावरुनही विरोधक आक्रमक झाले आहेत.काँग्रेसने विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेत ब्रेकफास्ट मीटचं आयोजन केलं होतं.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, माकप, भाकप, आययूएमएल, आरएसपी, केसीएम, जेएमएम, नॅशनल कॉन्फरन्स, तृणमूल काँग्रेस आणि एलजेडी या बैठकीत सहभागी होत आहेत. यावेळी इंधन दरवाढीविरोधात एकता दाखवण्यासाठी राहुल गांधी आणि इतर विरोधी खासदारांनी सायकल रॅली काढली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button