पिंपरी / चिंचवड

‘कोविडमुक्त मोशी’साठी वाढदिनी अतिश बारणे यांचा ‘ विधायक संकल्प’

नागरी आरोग्यासाठी विविध उपक्रम : राष्ट्रवादी नेत्यांची कार्यक्रमांना लक्षणीय उपस्थिती

मोशी । प्रतिनिधी
मोशी आणि परिसरातील नागरिकांना मोफत कोविड-१९ लसीकरण मोहीम हाती घेत ‘कोविडमुक्त मोशी’ करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी केला आहे. बारणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नागरी आरोग्य जपण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले. त्यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप, वाफेचे मशीन, मोफत छत्रीवाटप अशा विधायक उपक्रमांनी वाढदिवसाचा आगळा-वेगळा आदर्श बारणे युवापिढीसमोर निर्माण केला.
दरम्यान, अल्पावधीत सामाजिक उपक्रमांनी पिंपरी-चिंचवडमधील राजकीय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेला युवा नेता म्हणून अतिश बारणे यांचा उल्लेख केला जातो. त्यामुळे बारणे यांच्या कार्यक्रमांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सुनिल गव्हाणे, जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, कामगार नेते इरफानभाई सय्यद, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेवक विक्रांत लांडे, नगरसेवक मयुर कलाटे, नगरसेवक पंकज भालेकर, मा.सरपंच हरिभाऊ सस्ते, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, नगरसेवक संजय नेवाळे, यश साने (शहराध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) , युवा मा. उपसरपंच विठ्ठल कामठे, राष्ट्रवादीचे भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष शाम जगताप, युवा नेते गणेश सस्ते, उद्योजक प्रकाश आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते सुभाष बोऱ्हाडे, दत्तात्रय मोकाशी, दिलीप सस्ते, दिलीप बोऱ्हाडे, विजय सस्ते, प्रशांत सस्ते, दत्तात्रय कुटे, युवा नेते परशुराम आल्हाट, ग्रामपंचायत सदस्य बबन बारणे, युवा नेते विराज लांडे, युवा नेते लाला चिंचवडे आदी उपस्थित होते.

*अतिश बारणे यांच्यावर कौतुकाची थाप…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन केले होते. गेल्या १५ दिवसांपासून बारणे यांनी आपल्या प्रभागात विविध उपक्रमांचे नियोजन सुरू केले होते. दरम्यान, २ ऑगस्ट रोजी बारणे यांचा वाढदिवस होता. वाढदिनी कोणताही अनावश्यक खर्च न करता बारणे यांनी नागरी आरोग्याच्या दृष्टीने कार्यक्रमांचे नियोजन केले. त्याला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील आदींनी अतिश बारणे यांचे कौतुक केले.
*
परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होतेय समाधान…
मोशी आणि परिसरातील नागरिकांसाठी अतिश बारणे यांनी मोफत कोविड- १९ लसीकरण मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत सुमारे १ हजार २०० नागरिकांना लस देण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वत:च्या वाढदिनी विधायक उपक्रम हाती घेतल्यामुळे अतिश बारणे यांच्या कार्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अतिश बारणे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या सामाजिक उपक्रमाचे नियोजन सुरु केले होते. कोविड-19 मध्ये भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोफत कोविड लसीकरण आणि इतर आरोग्य शिबिर घेण्यात आले. दादांचा आणि आपला वाढदिवस समाजासाठी सत्कारणी लागला हेच आपल्याला समाधान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button