breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडाराजकारण

फक्त ब्राह्मण म्हणून बाबासाहेब पुरंदरेंना पवारांनी वृद्धपकाळात त्रास दिला, राज ठाकरेंचा आरोप

औरंगाबाद : “ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या घराघरात पोहोचवले. त्या आमच्या बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी त्यांच्या वृद्धापकाळात त्रास दिला”, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. “बाबासाहेब पुरंदरे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना पवारांनी त्रास दिला”, अशी टिप्पणीही राज ठाकरे यांनी केला. “पवारांनी जातीच्या दृष्टीने नेहमी माणसांना बघितलं. आमच्या घराण्यात जातीपातीला थारा नाही. आम्हाला जातीपातीचं देणंघेणं नाही. मी जात बघून एखाद्याकडे जात नाही, जात बघून पुस्तक वाचत नाही”, असंही राज म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. “दोनच सभा मी घेतल्या, पण या दोन सभांवरुन किती जण बोलतात. आजच्या सभेत सरकारची जी काही उरली सुरली राहिली आहे, ती काढण्यासाठी म्हणून आजची सभा घेतोय”, असं राज ठाकरे म्हणाले. सरकारवरील टीकेनंतर त्यांनी आपला मोर्चा पवारांकडे वळविला. “पवारांनी मी नास्तिक म्हणालो, तर राष्ट्रवादीच्या अनेकांनी त्यांचे पूजा करतानाचे, देवाचं दर्शन घेतानाचे फोटो व्हायरल केले. पण अरे वेड्यांनो, त्यांची लेक सुप्रिया सुळे यांनी स्वत: संसदेत सांगितलं की पवारसाहेब नास्तिक आहेत. मग आता राष्ट्रवादीवाले पुढे काय बोलणार?” असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला.

“आमच्या घरामध्ये जातपात शिकवली नाही, आमचं घराणं जातपात मानत नाही. आम्हाला जातीपातीचं देणंघेणं नाही. मी जात बघून एखाद्याकडे जात नाही, जात बघून पुस्तक वाचत नाही. पण राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने जातीयवाद वाढला. जेम्स लेन प्रकरण पवारांनी तापविण्याचा प्रयत्न केला. जर त्याच्याविरोधात एवढाच जर रोष होता, तर केंद्रात तुमचं सरकार सत्तेत होतं, त्यावेळी त्याला खेचून का आणलं नाही?”, असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला.

राज ठाकरे भाषणाच्या सुरुवातीला काय म्हणाले?

“दोनच सभा मी घेतल्या, पण या दोन सभांवरुन किती जण बोलतात… ठाण्याची सभा ज्यावेळी झाली, त्यावेळी मला दिलीप धोत्रेंनी फोन केला. साहेब, आपण संभाजीनगरला सभा घेऊया, संभाजीनगर हा तर महाराष्ट्राचा मध्य, आपण नक्की सभा घेऊ, असं मी त्यांना सांगितलं.

“मी फक्त हीच सभा घेऊन थांबणार नाही. यानंतरच्या सभा मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यात होणार, विदर्भातही सभा घेणार, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सभा घेणार, सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. कुठेही बोललो तरी जनतेपर्यंत माझं भाषण जाणारच… कोंबडं झाकायचं ठरवलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही.”

“ऐतिहासिक सभेत सरकारची जी काही उरली सुरली आहे, ती काढू, असं म्हणून सभा घेतली. राज्यात अनेक प्रश्न आहेत, याची कल्पना आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे. पण आजचे जे काही प्रमुख विषय आहेत, त्याला धरुन मी बोलणार आहे.”

यानंतर सभास्थळी जराशी गडबड झाली. प्रेक्षकांमधून आवाज यायला लागला. त्यावेळी राज ठाकरेंनी आपलं भाषण थांबवून गडबड करणाऱ्यांना इशारा दिला. माझ्या सभेत गडबड करायला कुणी असेल तर कार्यकर्त्यांनो तिथल्या तिथे हाणा. ही मनसेची सभा आहे, चौरंग करुन घरी पाठवेन, असा इशारा राज यांनी ठाकरी शैलीत दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button