breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

मावळचे आमदार सुनिल शेळके पोलिसांच्या ताब्यात!

मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या आमदारांची धरपकड

आमदार शेळके कडाडले, साहेब तुम्ही आम्हाला उचलले उद्या परत येऊन बसणार

मुंबईः आरक्षणासाठी महाराष्ट्रातला मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांचं आणि मराठा क्रांती मोर्चाचं शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. राज्यातल्या अनेक मराठा आमदारांना मतदारसंघांमधील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे. परिणामी मराठा आरक्षणासाठी आमदारांनी आंदोलन सुरू केलं आहे. अनेक मराठा आमदार मंगळवारपासून (३१ ऑक्टोबर) मंत्रालयाबाहेर आंदोलन करत आहेत. काल या आंदोलनात १० आमदार सहभागी झाले होते. आंदोलन करणाऱ्या आमदारांची संख्या आज २५ झाली आहे. दिवसेंदिवस आमदारांच हे मंत्रालयाबाहेरील आंदोलन तीव्र होऊन परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पोलिसांनी या आमदारांची धरपकड सुरू केली. यामध्ये मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जाता जाता मावळचे लोकप्रिय आमदार कडाडले. म्हणाले, साहेब, आज उचलून नेले तरी उद्या पुन्हा येऊन बसणार, असा इशाराच आमदार शेळके यांनी पोलिसांना दिला.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अशात मराठा आंदोलनाचे मुख्य नेते मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांनी उपोषणादरम्यान सरकारला आज सायंकाळपर्यंतची वेळ दिली आहे. आणि निर्णय घेण्याची विनंती केली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज (दि.1 नोव्हेंबर 2023) मुंबईत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. या सर्वपक्षीय बैठकीवेळी बाहेर सर्वपक्षीय आमदारांकडून ठिय्या आंदोलन कऱण्यात आले, ज्यात आमदार सुनिल शेळके यांचाही समावेश होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत
आमदार शेळके यांच्यासह अन्य आमदारांना आंदोलन करु नये, सरकार योग्य तो मार्ग काढेल, अशी विनंती करण्याचा प्रयत्न अनेक मंत्र्यांनी केला. मात्र सर्वपक्षीय आमदार निर्णयावर ठाम राहिले. आणि मनोज जरांगे पाटलांना समर्थन देत सरकारविरोधातील आंदोलन सुरु ठेवले. अखेर परिस्थिती बिघडते, हे पाहून स्थानिक मुंबई पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेतले. यात आमदार सुनिल शेळके यांचाही समावेश होता. यावेळी आमदार शेळके खूपच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी या आमदारांची धरपकड केल्यानंतर त्वेषाने आमदार शेळके म्हणाले, आज उचलून नेले तरी उद्या पुन्हा येऊन बसणार, असा इशाराच आमदार शेळकेंनी पोलिसांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button