पिंपरी / चिंचवड

गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

गांजा बाळगल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीसह दोघांकडून एक किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई महाळुंगे इंगळे येथे बुधवारी (दि. 16) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

श्यामकिरण सुभाष सोनार (वय 36, रा. महाळुंगे इंगळे), नंदा विलास बोत्रे (वय 55, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय लक्ष्मण कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे गांजा बाळगला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास महाळुंगे इंगळे येथील श्याम फ्रुट सेंटर नावाच्या दुकानामध्ये पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये एक किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम असा एकूण 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी श्यामकिरण सोनार याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button